Fri, Nov 16, 2018 15:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘शिवभक्ताचा मोठा भाऊ म्हणून मी जबाबदारी घेतो’; खासदार छत्रपती संभाजीराजे 

‘शिवभक्ताचा मोठा भाऊ म्हणून मी जबाबदारी घेतो’; खासदार छत्रपती संभाजीराजे 

Published On: Jun 09 2018 3:16PM | Last Updated: Jun 09 2018 3:16PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

शिवराज्याभिषेकाचा सोहळा डोळ्यात टिपून गड उतरत असताना गडावरील दगड डोक्यात पडल्याने मृत्यू झालेल्या अशोक उंबरे या तरूणाच्या कुटुंबाची खासदार संभाजीराजेंनी भेट घेऊन सांत्वन केले. ‘शिवभक्ताचा मोठा भाऊ म्हणून मी जबाबदारी घेतो’ असेही ते म्हणाले. 

यासंदर्भात खुद्द संभाजीराजेंनी एक फेसबूक पोस्ट लिहिली आहे. संभाजीराजेंची पोस्ट आणि एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

संभाजीराजेंची पोस्ट..

अशोक उंबरे यांच्या कुटुंबीयांच्या सदैव पाठीशी उभा राहणार

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असताना अंगावर दगड पडून दुर्दैवी अंत झालेल्या अशोक उंबरे यांच्या घरी आज भेट दिली. त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबाचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले असून अशोक उंबरेचा मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. या दुखःद घटनेमुळे त्यांच्या कुटूंबियांवर आघात झाला आहे. एक शिवभक्त म्हणून त्यांना मदत करणे माझे कर्तव्य आहे. यापुढेही त्यांच्या कुटूंबियांची जबाबदारी मोठा भाऊ म्हणून मी स्विकारत आहे.

अशोकचे मित्र भरतारी वारके यांना उंबरे कुटूंबाची सर्व जबाबदारी देण्यात आली असून या पुढे कोणत्याही प्रकारची गरज भासल्यास त्वरीत माझ्याशी संपर्क करण्यास सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख रुपये व वैयक्तिक मदत म्हणून १ लाख रुपये त्यांच्या कुटूंबीयांना देण्यात येणार आहेत. 

संभाजीराजे छत्रपती