Fri, Nov 16, 2018 21:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा समाजासमोर सरकार नतमस्तक: मुख्यमंत्री 

मराठा समाजासमोर सरकार नतमस्तक: मुख्यमंत्री 

Published On: Feb 02 2018 3:00PM | Last Updated: Feb 02 2018 3:00PMमुंबई : दिलीप सपाटे 

राज्यभर काढण्यात आलेल्या मोर्चांव्दारे मराठा समाजाने कृष्णाप्रमाणे आपले विराट रूप दाखविले. त्यापुढे राज्य सरकारही नतमस्तक झाले. सरकारने या मोर्चांनंतर मराठा समाजाच्या अनेक मागण्या मान्य केल्या. आजपासून प्रारंभ झालेल्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानातून राज्यात मराठा समाजाचे नोकरी मागणारे नाही तर देणारे तरूण तयार होतील, असा विश्वास मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.  छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

मराठा समाजाने काढलेल्या लाखोंच्या मोर्चांनंतर राज्य सरकारने विविध आश्वासने दिली होती. स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे सक्षमीकरण करून आर्थिक दुर्बल घटकातील तरूणांना उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार आज बिनव्याजी कर्ज योजनेचे लोकार्पण करण्यात आले. सहा लाभार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. 

वैयक्तीक कर्ज परतावा योजनेत १० लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार असून त्याचे १२ टक्क्यांपर्यंतचे व्याज सरकार भरेल. गट कर्ज योजनेत जास्तीत जास्त ५० लाखांचे कर्ज दिले जाणार आहे. गट शेतीसाठीही १० लाखापर्यंत बीनव्याजी कर्ज दिले जाणार आहे.