Wed, Aug 21, 2019 01:59



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छगन भुजबळांच्या जामिनावर उद्या फैसला

छगन भुजबळांच्या जामिनावर उद्या फैसला

Published On: Dec 17 2017 3:04AM | Last Updated: Dec 17 2017 3:04AM

बुकमार्क करा





मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र सदनासह अनेक गैरव्यवहारांप्रकरणी मनी लॉडरिंग कायद्याअंतर्गत अटकेत असलेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जामिनाचा फैसला सोमवारी होणार आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम़  एस़  आजमी हे जामीन अर्जावर काय निर्णय देतात याकडे राजकीय तसेच सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. 

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी मार्च 2016 पासून अटकेत असलेल्या छगन भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांनी यापूर्वी जामिनासाठी पीएमएलए कोर्ट आणि हायकोर्ट यांच्याकडे धाव घेतली. मात्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्यातील कलम 45 (1) असंविधानिक ठरवत नुकताच रद्द केल्याने भुजबळांनी पुन्हा नव्याने जामिनासाठी अर्ज केला आहे. ईडीने या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला आहे. पीएमएलएचे कलम 45 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले असले तरी त्याआधारे भुजबळांना जामीन देता येणार नाही़  त्यांना आपण गुन्हा केला नाही हे सिद्ध करावे लागेल, अशी भूमिका घेतली आहे.