Thu, Apr 25, 2019 21:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छातीत दुखू लागल्याने छगन भुजबळ रुग्‍णालयात

छातीत दुखू लागल्याने छगन भुजबळ रुग्‍णालयात

Published On: Aug 06 2018 12:14PM | Last Updated: Aug 06 2018 12:18PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती बिघडली. आज सकाळी अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्‍णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. 

छगन भुजबळ सकाळी पीएमएलए न्यायालयात हजर राहण्यासाठी जात होते. यावेळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांच्यावर जसलोक रुग्‍णालयात उपचार सुरू असून श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्रास वाढल्यास भुजबळांना लीलावती रुग्‍णालयात हालवण्याची शक्यता आहे.