Tue, Sep 25, 2018 03:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उपचारांसाठी छगन भुजबळ यांना केईएम मध्ये केले दाखल

उपचारांसाठी छगन भुजबळ यांना केईएम मध्ये केले दाखल

Published On: Mar 13 2018 4:47PM | Last Updated: Mar 13 2018 4:47PMमुंबई : प्रतिनिधी

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अखेर जेजे रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांना पुढील उपचारांसाठी केईएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. 

जेजे रूग्णालयात हिपॅटोपॅनक्रिअ‍ॅटोबिलिअरी (एसपीबी) आणि गॅस्ट्रोएन्टरोलॉजी (जीआय) सुपर स्पेशालिटी विभाग उपलब्ध नाहीत. त्यामुळे पोटाच्या आजारावर उपचार करण्यासाठी केईएम रूग्णालयाच्या हिपॅटोपॅनक्रिअ‍ॅटोबिलिअरी विभागात छगन भुजबळ यांना दाखल करण्यात आले आहे.