Sun, May 26, 2019 08:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भुजबळांना जामीन मिळाला; कोण काय म्हणाले.. वाचा

भुजबळांना जामीन मिळाला; कोण काय म्हणाले.. वाचा

Published On: May 04 2018 5:02PM | Last Updated: May 04 2018 5:24PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाला. भुजबळांना जामीन मंजूर झाल्याचे वृत्त राज्यभर वाऱ्यासारखे पसरले. यानंतर राजकीय वर्तुळातील दिग्गजांच्या प्रतिक्रीया येण्यास सुरूवात झाली. 

‘देर आये दुरूस्त आये...भगवान के घर पे देर है पर अंधेर नही है’

छगन भुजबळ यांना जामिन मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या न्यायव्यवस्थेचे सर्व वकीलांचे मी आभार मानते. भुजबळांना जामिन मिळाल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी मी जेव्हा त्यांना भेटायला  गेले होते तेव्हा भाजपने मला अडवले. भुजबळांना भेटण्यास परवानगी दिली नाही, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

भुजबळांना जामिन मिळायला वेळ लागला. पण, आरोप सिद्ध होण्याआधीच भुजबळांनी २६ महिने कारागृहात शिक्षा भोगावी लागली. आम्ही सत्तेत नाही त्यामुळे काही करू शकलो नाही. हा भुजबळांवर नाही तर आमच्या पक्षावर झालेला अन्याय असल्याचे मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले. 

आमचे आणि भुजबळांचे वैयक्तीत संबंध आहेत. शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. गेल्या अडीच वर्षात आम्ही भुजबळांच्या जामिनासाठी पाठपुरावा केला. भुजबळांच्याबाबत जे झाले ते देशाच्या इतिहासात असे कधीही झाले नाही. ‘देर आये दुरूस्त आये...भगवान के घर पे देर है पर अंधेर नही है’ असेही त्या म्हणाल्या-सुप्रिया सुळे, खासदार 

यंत्रणा म्हणते म्हणून तुरूंगात कोंडून ठेवणे चूक 

भुजबळांना जामीन मिळाल्याचा आनंद होतोय. पण, आरोप सिद्ध न होता त्यांना आयुष्यातील २६ महिने तुरूंगात काढावी लागली याची खंत आहे. जामीन मिळण्यास उशीर झाला. एखाद्या व्यक्तीला अडकवण्यासाठी कागदपत्रे करून त्याच्यावर दबाव आणला जातो. फक्त भुजबळच नाहीत तर त्यांच्यासारख्या निष्पाप लोकांना गुन्हा सिद्ध होण्याआधीच जेलमध्ये रहावे लागते हे वाईट आहे. कोणत्याही प्रकारचा निकाल न देता केवळ यंत्रणा म्हणते म्हणून तुरूंगात कोंडून ठेवणे चूक आहे. त्यांना या प्रकरणात दोषी ठरवल तर आम्हाला वरच्या कोर्टात अपिल करण्याचा अधिकार आहे.

यंत्रणेचा दबाव ठेवण्यासाठी असे निर्णय घेतले जातात आणि या निर्णयात निष्पाप लोक भरडून निघतात. भुजबळांनी सामान्य जनतेसाठी केलेले काम सर्वांच्या समोर आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम त्यांनी केले. भुजबळ बाहेर आल्याने पक्षाला त्याचा फायदा नक्कीच होईल. माझ्या माहितीप्रमाणे भुजबळ साहेब सोमवारी तुरूंगातून बाहेर येतील. आम्ही सगळेच त्यांचे स्वागत करू, असे पवार म्हणाले. -अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री


भुजबळ बाहेर आल्यानंतर दुप्पट वेगाने प्रतिकार करतील 

छगन भुजबळ राष्ट्रवादीचे नेते आहेत. आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले तरी भाजप सरकारने त्यांच्यावर दया दाखवली नाही. एखाद्या चांगल्या नेत्याला बदनाम कसे करण्याचे याचे हे चांगले उदाहरण आहे. दोन वर्षे छगन भुजबळ शांत असले तरी बाहेर आल्यानंतर ते दुप्पट वेगाने प्रतिकार करतील. ते जनतेशी हितगुज करतील त्यांची भूमिका नक्की काय ते समजावून सांगतील. 

सत्ताधाऱ्यांना बदनामी करण्याचा ताळतंत्र राहीला नाही. राज्याच्या पालकमंत्र्यांनी ‘भुजबळांच्या बाजूला २ कोठड्या रिकाम्या असल्याचे’ भाष्य केले होते. हे चुक आहे. विरोध करण्यासाठी व्यवस्थेचा वापर केला जातोय. 

भाजप सरकार हातात असलेल्या अधिकारांचा चुकीचा वापर करत आहे. गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झाली तर आम्हाला मंजूर पण सिद्ध होण्याआधीच शिक्षा दिली जाते हा कुठला न्याय? भाजप सुडाचे राजकारण करत आहे. हे त्यांच्या वागण्यातून असे दिसते. भुजबळांमध्ये नेतृत्वाचे गुण त्यामुळे पक्षाला नवी बळकटी येईल. -जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस 

भुजबळांना तुरूंगात ठेवणे;म्हणजे, ओबीसी लोकांना डांबून ठेवणेच 

छगन भुजबळांची चौकशीसाठी तुरूंगात ठेवले असले तरी हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे. भुजबळ तुरूंगात असताना आम्ही ‘अन्याय पे चर्चा’ मोहीम राबवली होती. भुजबळ साहेबांना तुरूंगात ठेवणे म्हणजे, भटक्या विमुक्तजाती आणि ओबीसी लोकांना डांबून ठेवणेच असल्याचे भुजबळ यांच्या एका कार्यकर्त्याने सांगितले. हा बहुजनांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. -भुजबळांचा एक कार्यकर्ता

 

Tags : Chhagan Bhujbal, bail, Political, Leader, Reactions,Supriya Sule, Ajit Pawar, Jayant Pawar