होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मी लवकरच तुमच्या भेटीला येतोय, भुजबळांचे पहिले ट्विट

जामीनावर सुटल्यानंतर छगन भुजबळांचे पहिले ट्विट

Published On: May 20 2018 3:12PM | Last Updated: May 20 2018 5:33PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ दोन वर्षाहून आधिक काळ तुरूंगात होते. सध्या ते जामिनावर सुटले आहेत. आज छगन भुजबळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. त्यांनी ट्‌विटर अकाऊंट सुरू करून पहिल्या ट्‌विटमधून आपल्यावर दाखवलेल्या विश्वासबद्दल त्यांनी हितचिंतकांचे आभार मानले आहेत. 

या ट्‌विटमध्ये त्‍यांनी वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर मी आपल्याशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. डॉक्‍टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितल्याने भुजबळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधायला सुरूवात केल्याचे त्यांच्या पहिल्या ट्विटवरून दिसून येते.

Image may contain: one or more people, people sitting and text 

सध्याच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे या दिग्गज नेत्यांसोबतच आता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. आगामी काळात ते आपल्या भूमिका सोशल मीडियाच्या माध्यामतून मांडणार असल्याचे संकेतच त्यांनी या पहिल्या ट्‌विटमधून दिले आहेत.