होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हिमांशू रॉय म्हणाले होते, 'केमोथेरपीलाही मर्यादा असतात'

हिमांशू रॉय म्हणाले होते, 'केमोथेरपीलाही मर्यादा असतात'

Published On: May 11 2018 5:56PM | Last Updated: May 11 2018 5:56PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. रॉय यांना मी कालच (गुरुवारी) भेटलो होतो. पण ती त्यांची अखेरची भेट ठरेल असे वाटले नाही, असे राज्याचे माजी गृहमंत्री जयंत पाटील म्हणाले. 

काल सकाळी हिमांशू रॉय आणि माझी जिममध्ये भेट झाली होती. त्यावेळी कॅन्सरबाबत त्यांच्याशी चर्चा झाली. 'केमोथेरपीला सुद्धा काही मर्यादा असतात' असं ते म्हणाल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. आमची कालची भेट अखेरची ठरेल असे वाटले नसल्याचे पाटील म्हणाले.  

वाचा : पोलिसातला बॉडी बिल्डर चटका लावून गेला 

"ते (हिमांशू रॉय) थोडेसे दुःखी वाटत होते. उपचारांमुळे किती वेदना होतात, हे ते सांगत होते. त्यांचा चेहरा काळवंडला होता. डॉक्टर म्हणतात प्रोग्रेस चांगली आहे, पण ते गॅरेंटी देत नाहीत असंही रॉय म्हणाल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. 

"पण ते असे काही पाऊल उचलतील असं मात्र वाटलं नाही. सात आठ महिन्यांपूर्वी जेव्हा मी  त्यांच्याशी बोललो होतो, तेव्हा ते पॉझिटिव्ह होते. आजाराशी लढा देईन असं ते बोलल्याची आठवण पाटील यांनी सांगितली.  

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (आस्थापना) आणि माजी ATS प्रमुख हिमांशू रॉय यांनी आपल्या राहत्या घरी सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केल्याच्या बातम्या झळकल्या आणि सर्वांनाच धक्का बसला आहे. 

Tags: Himanshu Roy, Suicide, Chemotherapy