Fri, Jul 19, 2019 15:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवरात्रीचा दिवा पडून लागलेल्या आगीत चेंबूरमध्ये 2 मुलींसह 8 जखमी

नवरात्रीचा दिवा पडून लागलेल्या आगीत चेंबूरमध्ये 2 मुलींसह 8 जखमी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई: वार्ताहर

चेंबूरच्या ठक्‍कर बाप्पा कॉलनीतील राजीव गांधीनगरात जगदीश जठोलिया यांच्या घरामध्ये नवरात्रनिमित्त देवाजवळ लावलेला दिवा जमिनीवर पडून लागलेल्या आगीत दीड वर्षाच्या मुलीसह 8 जण जखमी झाले आहेत. 

जगदीश जठोलिया (45) हे 70 टक्के तर त्यांची दीड वर्षाची मुलगी चांदणी 60 टक्के भाजली. तनुजा (दीड महिना), साक्षी (4), प्रमोद (5), पार्वती जठोलिया (23), प्रकाश जठोलिया (30),गीता जठोलिया (40) हे देखील भाजले असून सर्वांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठक्‍कर बाप्पा कॉलनीत चप्पल बनवण्याचे कारखाने आहेत.

अनेक घरांत पोटमाळ्यावर हा व्यवसाय चालतो. राजीव गांधीनगरातील जगदीश जठोलिया (45) यांचाही असा कारखाना आहे. मात्र पोटमाळ्यावर त्यांचे कुटुंबीय राहतात. रविवारी देवासमोर लावलेला दिवा खाली पडला आणि चप्पल बनवण्याचे साहित्य, केमिकलमुळे काही क्षणातच आग पसरली.

Tags :  Chembur, fire, With 2 girls, 8 injured, mumbai news 


  •