Tue, Jul 23, 2019 02:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोबाईलवर चॅटिंग केल्याने तरुणाला मारहाण  

मोबाईलवर चॅटिंग केल्याने तरुणाला मारहाण  

Published On: Aug 05 2018 1:43AM | Last Updated: Aug 05 2018 1:02AMनालासोपारा : वार्ताहर

नालासोपारा पश्चिमेत हनुमान नगर येथे राहणार्‍या एका तरुणाला त्याच्या प्रेयसीच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी  घडली. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमान नगर येथील अंकित गुप्ता (18)  हा आपल्या परिवारा सोबत राहतो. त्याची त्याच परिसरात राहणार्‍या एका तरुणीशी ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर ते दोघे चॅटिंगही करायचे. हा सर्व प्रकार तरुणीच्या कुटुंबीयांना समजल्यावर त्यांनी आपल्या मुलीला अंकितला नालासोपारा येथील गुरुकुल क्लासेसजवळ भेटायला बोलवण्यास सांगितले. तिने सांगितल्यानुसार अंकित तेथे भेटायला आला असता, त्याला धीरज गुप्ता, अनिस खान, राम कानोजिया, दिवेश दुबे, सचिन दुबे यांनी गुरुकुल क्लासेसमध्ये बंद करून शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्याच्या वडिलांनी दिलेल्या फि र्यादेनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जखमी अंकितवर अलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती नालासोपारा पोलिसांनी दिली. या प्रकरणी अद्यापि कोणालाही अटक करण्यात आली नाही.