Mon, Feb 18, 2019 20:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आदिनाथ कोठारेंच्या बोगस अकाऊंटद्वारे महिलेशी चॅट  

आदिनाथ कोठारेंच्या बोगस अकाऊंटद्वारे महिलेशी चॅट  

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 26 2018 1:06AMमुंबई : प्रतिनिधी

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांचा अभिनेता मुलगा आणि निर्माता आदिनाथ महेश कोठारे यांचे बोगस फेसबुक अकाऊंट उघडून अज्ञात व्यक्तीने एका महिलेशी चॅट करुन त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आदिनाथ कोठारे यांच्या तक्रारीवरुन समतानगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. समतानगर पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करीत आहेत. बॉलीवूड अभिनेता, अभिनेत्री, निर्माता-दिग्दर्शक यांचे अनेकदा फेसबुक, ट्विटर हॅक किंवा बोगस अकाऊंट बनवून फसवणुक झाल्याचा प्रकार नवीन नाही. त्यात आता आदिनाथ कोठारे यांच्या नावाची भर पडली आहे. काही दिवसांपासून अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्या नावाचे बोगस प्रोफाईलवरुन अनेकांना फे्रण्ड्स रिक्‍वेस्ट पाठविण्यात आली होती.

अनेकांनी त्याच्याशी चॅट केले होते. अकाऊंट खरे आहे असे वाटावे म्हणून या व्यक्तीने फेसबुक अकाऊंटमध्ये आदिनाथ कोठारे यांच्या फोटोसह त्यांच्या कुटुंबियांचे फोटो ठेवले होते. या व्यक्तीने एका महिलेशी चॅट करुन त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसची बदनामीही केली होती. इतकेच नव्हे तर याच अकाऊंटमधून अनेकांची माहिती मागविण्यात आली होती. हा प्रकार मित्रमंडळीकडून आदिनाथ यांना समजताच संबंधित फेसबुकवर जाऊन पाहणी केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नावाने बोगस फेसबुक अकाऊंट उघडल्याचे समजले. त्यांनी समतानगर पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती.