Thu, Mar 21, 2019 11:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कासकर, दाऊद, रवी पुजारीविरोधात आरोपपत्र दाखल 

कासकर, दाऊद, रवी पुजारीविरोधात आरोपपत्र दाखल 

Published On: Jul 01 2018 2:16AM | Last Updated: Jul 01 2018 1:25AMठाणे : खास प्रतिनिधी

मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी दाऊद इब्राहिम, त्यांचा भाऊ इक्बाल कासकर आणि अनीस इब्राहिम यांच्या विरोधात ठाणे पोलिसांनी ठाणे सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्याचबरोबर आणखी एका खंडणीच्या गुन्ह्यात गँगस्टार रवी पुजारी, दिनेश राय, नितीन राय यांच्याविरोधातही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

मुंबईतील व्यावसायिक श्याम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ऑक्टोबर 2017 मध्ये ठाणे पोलिसांनी इक्बाल कासकर, दाऊद, अनिस यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. गोराई परिसरातील 38 एकर जागा बिल्डरने दुसर्‍याला दिली होती.. त्याच्याकडून दोन कोटी रुपये अग्रिम रक्कम घेतली होती.  दरम्यान जमिनीचे भाव वाढल्याने बिल्डरनेही भाव वाढवले आणि त्यातून दोघांमध्ये वाद झाला. यातून इक्बाल कासकर याचा हस्तक्षेप झाला आणि त्याने जमिन मालकाकडे तीन कोटींची खंडणी उकळली. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात ऑक्टोबर 17 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.