Thu, Aug 22, 2019 14:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई बदलतेय : मुख्यमंत्री

मुंबई बदलतेय : मुख्यमंत्री

Published On: Apr 26 2019 1:51AM | Last Updated: Apr 26 2019 1:51AM
मुंबई : प्रतिनिधी 

मुंबई शहर बदलतेय... संपूर्ण शहरात मेट्रो रेल्वेचे जाळे उभे राहत आहे. उपनगरीय रेल्वेसाठी गेल्या पाच वर्षांत 65 हजार कोटी रुपयांची तरतूद पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात झाली. या निधीतून मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात सरकते जिने, नवे फलाट, आणि अन्य सर्व सुविधा येत्या दोन तीन वर्षांत उभ्या राहतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना दिली. 

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या बुधवारी रात्री झालेल्या विजय संकल्प सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गेल्या पाच वर्षात बदलेल्या मुंबईकडे लक्ष वेधले.  प्रतिदिन 70 लाख प्रवासी वाहून नेण्याची मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता दोन - तीन वर्षांत दीड कोटी प्रवाशांपर्यंत वाढणार आहे. यासाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोदी सरकार सज्ज आहे. मुंबईतील रेल्वेसेवा, बससेवा, मेट्रोसेवा यासारख्या सर्व सेवांसाठी इंटीग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचा अवलंब केला जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

पंतप्रधान आवास योजनेद्वारे 2011 पासून मुंबईत वास्तव्यास असलेल्या प्रत्येकाला किमान 300 वर्गफुटाचे घर देणार असल्याची हमीही मुख्यमंत्र्यांनी दिली. काँग्रेसच्या राजवटीत आजवर कुणालाच काहीही मिळालेले नाही, हे जनता चांगलीच जाणून आहे, असे ते म्हणाले.