Tue, Jun 18, 2019 20:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरावी ऑनलाईन प्रवेशात होणार बदल

अकरावी ऑनलाईन प्रवेशात होणार बदल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

गुणवत्ता यादीत नाव आले म्हणून विद्यार्थ्याचा अकरावी ऑनलाईन प्रवेश कन्फर्म करणार्‍या महाविद्यालयांना आता चाप बसणार आहे. प्रोसीड टू अ‍ॅडमिशन हा नवा पर्याय ऑनलाईन अर्जात देण्यात येणार आहे. महाविद्यालयांना प्रवेशाचे अधिकार देण्यापेक्षा आता विद्यार्थ्यांने या पर्यायावर क्लिक केले तरच त्याचा प्रवेश निश्‍चित होणार आहे. 

यादीच्या अगोदरच गोंधळ, लांबत चाललेली प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना आलेल्या तक्रारी अशा अनेक अडचणींना तोंड देत पूर्ण झालेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत यावर्षी मोठे बदल करण्याची तयारी सुरू झाली आहे. सहविचार सभेतही प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी विविध उपाययोजना आणि तक्रारी मांडल्या आहेत.अकरावीच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थ्याला एखाद्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला तर ते महाविद्यालय विद्यार्थ्याला न विचारताच त्याचा प्रवेश कन्फर्म करतात. अनेक दुय्यम दर्जाच्या महाविद्यालयामध्ये असे प्रकार सुरू असून याविषयीच्या अनेक तक्रारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेश अलोकेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनाही लॉगीनमध्ये अशी लिंक देण्यात येणार आहे.

गेल्यावर्षीपर्यंत हे प्रवेश शून्य फेरीत होत होते. महाविद्यालयस्तरावर विद्यार्थ्यांकडून ऑफलाईन अर्ज भरून घेतल्यावर हे प्रवेश ऑनलाईन प्रवेशाच्या संकेतस्थळावर अपलोड होत होते. पण आता हे प्रवेशही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचा विचार आहे.त्याचबरोबर अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या माहिती पुस्तिकेत महाविद्यालय यादी देण्यात येणार नाही. ही माहिती विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या संकेतस्थळावर मिळणार आहे. ही माहिती यंदा देणार नसल्याने माहिती पुस्तिकेची जाडीही यंदा कमी होणार असून दर कमी होण्याचेही संकेत आहेत.

प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या फेरीचा कालावधी कमी करावा जेणेकरून वर्ग वेळेत सुरू होतील याकडे लक्ष, द्या त्यामुळे अकरावीचे वर्ग लवकर सुरू होतील.यासंदर्भातही विचारविनियम केला जाणार आहे.

नव्या महाविद्यालयांना अंकुश बसणार का?

एकीकडे जागा रिक्‍त असताना नव्याने महाविद्यालयांना परवानगी देणार्‍या महाविद्यामुळे यंदा अकरावीला तब्बल 62 हजार जागा रिक्‍त राहिल्या आहेत. मुंबई महानगरक्षेत्रात 786 महाविद्यालयात 2 लाख 97 हजार 315 इतक्या जागा होत्या. त्यापैकी ऑनलाईन प्रवेश पद्धतीत तब्बल 1 लाख 82 हजार 219 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर विविध कोट्यातून 52 हजार 959 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. रिक्‍त जागांची संख्या कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग यंदा नव्या महाविद्यालयांच्या मान्यता रोखणार का? असाही प्रश्‍न आहे.

Tags : mumbai, mumbai news, 11th online entry, Changes,


  •