Tue, Jul 16, 2019 14:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हमे टोकनेवालोंको छोडेंगे नही : चंद्रकांत पाटील

हमे टोकनेवालोंको छोडेंगे नही : चंद्रकांत पाटील

Published On: May 24 2018 1:58AM | Last Updated: May 24 2018 1:52AMमोखाडा : वार्ताहर 

आम्ही उमेदवारी जाहीर करण्याआधीच शिवसेनेने आमचा उमेदवार पळवला. शिवसेनेने कळ काढल्यामुळेच या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री आणि आम्हा सर्वांना लक्ष घालावे लागले, कारण आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. हम किसीको टोकते नही मगर किसीने टोका तो उसको छोडते नही, असा इशाराच राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिला. ते बुधवारी (काल) मोखाड्यात आयोजित केलेल्या प्रचारसभेत बोलत होते.

सेनेचा आणि आमचा चांगला संसार सुरू होता. सर्व काही बरे चालले असताना पालघरात सेनेने कळ काढली. त्यातूनच हे सगळे सुरू झाले, असे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी यावेळी भाजपने राबवलेल्या मोफत गॅसवाटप, कर्जमाफी, जलयुक्त शिवार, माती परीक्षण आदी योजनांची माहिती उपस्थितांना दिली. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांतून तब्बल 16 हजार गांवाना पाणीयुक्त केल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जूून करताना भाजपच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.

यावेळी ज्येष्ठ नेते देवीदास पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे, तालुकाध्यक्ष रघुवीर डिंगोरे, नीलेश सांबरे, हबीब शेख आदी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.