Wed, Feb 26, 2020 08:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘ओखी’ला झिडकारत भिमसैनिक चैत्यभूमीवर नतमस्‍तक 

‘ओखी’ला झिडकारत भिमसैनिक चैत्यभूमीवर नतमस्‍तक 

Published On: Dec 06 2017 1:43PM | Last Updated: Dec 06 2017 1:43PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रकाश साबळे 

मुंबईत ओखी वादळामुळे आलेल्या पावसाने देशभरातून आलेल्या भीमसैनिकांचे प्रचंड हाल झाले. मात्र, या वादळाला झिडकारत  भीम सैनिकांनी चैत्यभूमीवर नतमस्तक होण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्‍या आहेत. शिवाजीपार्क मैदानात पावसाच्या पाण्यामुळे सर्वेत्र चिखल सदृश्य परिसिस्थिती निर्माण झाली असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायींनी दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. 

शिवाजी पार्कवरही चिखल तूडवत पुस्तके, कॅसेट, विविध सरकारी योजनांची माहिती, वैद्यकीय सेवांचे उभारलेल्या स्‍टॉल यांना भेटी देत महामानवाला अभिवादन केले. 

‘गेल्या ६१ वर्षापासून आमचे आणि शिवाजी पार्क मैदानाचे तयार झालेले नाते अशा कितीही ओखी वादळाला तोंड देण्यास समर्थ आहेत. यामुळेच आमची पावले आपोआपणच शिवाजी पार्ककडे वळत असल्याच्या भावना आकोल्याहून आलेले सुखदेव काळे या  भीम सैनिकाने दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्‍त केल्‍या. 

राज्यासह परराज्यातून आलेले भीमसैनिक पहाटेपासून रांगेत उभे राहून डॉ. बाबासाहेब यांच्या चरणी नतकस्‍तक होत आहेत. शिवाजी पार्कमध्ये साचलेला चिखल आणि पाणी तुडवित भीमसैनिक अत्यंत शिस्तबध्दतीने जात  असल्याचे दिसून येत आहे. त्यांची गैरसोय होवू नये,  म्हणून मुंबई महापालिका, पोलिस, समता सैनिक दल, एनडीआरएफ, डॉक्‍टर आदी यंत्रणा काम करत आहेत. खेड्यापाड्यांतून आलेल्या भीमसैनिकांची जेवणाअभावी फरफट होवू नये, म्हणून विविध सामाजिक, आंबेडकरी  संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांच्याकडून मोफत अल्पोहार, जेवनाची सोय केली आहे. यामुळे नेहमीप्रमाणेच दादर चैत्यभूमीवर भीमसैनिकांची गर्दी पाहयला मिळत आहे.