Sat, Jul 20, 2019 21:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भुजबळ समर्थकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

भुजबळ समर्थकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Published On: Feb 05 2018 2:12PM | Last Updated: Feb 05 2018 2:12PMमुंबई : प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’  या निवासस्थानी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ समर्थकांनी भेट घेतली. छगन भुजबळ भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगात असून त्यांच्या समर्थकांनी‘अन्याय पे चर्चा’घेत आहेत. आज त्याच संदर्भात भुजभळ समर्थकांनी सकाळी ११ वाजता राज ठाकरे यांची भेट घेतली. 

मनसेप्रमुख राज ठाकरे व छगन भुजबळ यांचे राजकीय हाडवैर जगजाहीर आहे. मनसेप्रमुखांनी महापालिका निवडणुकीत भुजबळांची केलेली नक्‍कल व विधानसभा निवडणुकीत मफलरवरची टीका भुजबळांच्या जिव्हारी लागली  होती. भुजबळ सध्या तुरुंगात असून त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना समर्थकांमध्ये आहे. त्यामुळे समर्थकांनी जनआंदोलन उभारत ‘अन्याय पे  चर्चा’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यास राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व भाजपा नेत्यांचे समर्थन  मिळत आहे.

भुजबळ समर्थकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली यावेळी माजी खासदार देवीदास पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार शिरीष कोनवाळ,प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहर अध्यक्ष अंबादास खैरे, जि.प.अध्यक्ष मायावती पगारे, पंढरीनाथ थारे, प्रकाश वडके, दिगंबर गिते, सुनिल मोरे, राधाकिसन सोनावणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मनसे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत हेही उपस्थित होते.