Thu, Aug 22, 2019 10:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छगन भुजबळांच्या प्रकृतीची सभागृहात चिंता

छगन भुजबळांच्या प्रकृतीची सभागृहात चिंता

Published On: Mar 06 2018 1:49AM | Last Updated: Mar 06 2018 1:25AMमुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीबद्दल सोमवारी विधान परिषदेत चिंता व्यक्त करण्यात आली. आमदार कपिल पाटील यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे भुजबळ यांच्या तब्बेतीची माहिती सभागृहात देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यांच्या मागणीचे समर्थन करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जे. जे. रुग्णालयात त्यांना योग्य उपचार मिळत नसल्याकडे लक्षवेधत त्यांना खासगी रुग्णालयात योग्य ते उपचार करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली. 

माजी मंत्री आणि विद्यमान आमदार असूनही भुजबळ यांना जेजे रुग्णालयात सामान्य रुग्णांच्या रांगेत उभे रहावे लागते. अँजिओग्राफी, ईसीजी तपासणीचे अहवाल अ‍ॅबनॉर्मल आले तरी डॉक्टर त्यांना जेलमध्ये पाठवा म्हणतात. न्यायदानात जे होईल ते होईल पण प्रशासन त्यांच्याबाबतीत असे का करत आहे, असा प्रश्‍न करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.