होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लेटमार्क

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लेटमार्क

Published On: Jan 02 2018 7:58AM | Last Updated: Jan 02 2018 2:04AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली. ठाकुर्ली येथे फाटक उघडे राहिल्याने सकाळपासूनच मध्य रेल्वेच्या लोकल उशिराने धावत होत्या. त्यानंतर हार्बर मार्गावरील गोवंडी-चेंबूरदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने लोकलसेवा ठप्प झाली. नव्या वर्षाची सुरुवातच लेट मार्कने झाल्याने मुंबईकरांचा हिरमोड झाला. 

 मुंबई : प्रतिनिधी

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली. ठाकुर्ली येथे फाटक उघडे राहिल्याने सकाळपासूनच मध्य रेल्वेच्या लोकल उशिराने धावत होत्या. त्यानंतर हार्बर मार्गावरील गोवंडी-चेंबूरदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने लोकलसेवा ठप्प झाली. यामुळे सकाळी ऑफिसला निघालेल्या कामगारवर्गाला मनस्ताप सहन करावा लागला. सकाळपासूनच मुंबईकडे येणार्‍या धीम्या आणि जलद मार्गावरील लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावल्या. लोकलसेवा उशिरा धावत असल्याने नववर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवाशांची गैरसोय झाली. 

 मध्य रेल्वेवरील तांत्रिक बिघाडांमुळे लोकल ट्रेनचा खोळंबा झाल्याच्या घटना डिसेंबरमध्ये वाढल्या होत्या. नववर्षाच्या पहिल्या दिवशीही मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटे उशिराने धावल्या. या मागील नेमके कारण काय याबाबत प्रवाशांना कोणतीही माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांच्या अडचणीत भर पडली. पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्याही 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत असल्याची तक्रार प्रवासी करत होते.

मध्य रेल्वेपाठोपाठ हार्बर रेल्वेवरील प्रवाशांनाही मनस्तापाचा सामना करावा लागला. वाशीजवळ रेल्वेरुळाला तडा गेल्याने मुंबईकडे जाणार्‍या गाड्यांची वाहतूक उशिराने सुरु होती. गेल्या दहा दिवसांपासून हार्बर मार्गावर सावळागोंधळ सुरू असून या मार्गावर सातत्याने होणार्‍या त्रासामुळे अखेर शनिवारी रेल्वेप्रवाशांचा संताप अनावर होऊन बेलापूर व नेरुळ स्थानकांत रेल्वेप्रवाशांनी मोटरमन तसेच गार्ड यांना घेराव घातला होता.