Wed, Jun 26, 2019 11:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे केंद्राचे प्रयत्न

मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे केंद्राचे प्रयत्न

Published On: Mar 20 2018 2:13AM | Last Updated: Mar 20 2018 2:13AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

मुंबई होणारे वित्तीय केंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये नेले. गुजरातमध्ये गिफ्ट सिटीचे काम सुरू असून तिचे महत्त्व वाढविण्यासाठी मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न केेंद्राकडून सुरू आहेत. बुलेट ट्रेन हा त्याचाच एक भाग असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी केला. अनुदानाच्या मागण्यांवर बोलताना जयंत पाटील यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढविला. 

ते म्हणाले, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र यातून हातात काय आले, हे अजूनही समजले नाही. मेक इन महाराष्ट्रद्वारे 8 लाख कोटी गुंतवणूक येणार होती. प्रत्यक्षात किती प्रोजेक्ट आले याची यादी पटलावर ठेवावी, मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्येही 12 लाख कोटींची गुंतवणूक आली असल्यास ती माहितीही सभागृहाला द्यावी. मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्या व्यतिरिक्त कुणालाही या प्रकल्पाविषयी माहिती नाही. फक्त आकडे फुगवून सांगितले जात आहेत, असा टोला त्यांनी लगावला. 

बेरोजगारांना रोजगार देण्याची हमी सरकारने दिली होती. त्याच्या 5 टक्के देखील रोजगार आणण्यात सरकारला यश आलेले नाही. दुसरीकडे इज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा हल्ला जयंत पाटील यांनी चढविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर विकत घेताना परदेश दौर्‍यावर 40 लाख रुपयांचा खर्च झाला मात्र, आता घर ताब्यात आल्यानंतरही आता परदेश दौर्‍यासाठी 2 कोटी रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. तर, इतर खर्च 4 कोटींवरून 18 कोटींवर कसा काय गेला? याची माहितीही पाटील यांनी सरकारकडून मागितली. 

tags : Mumbai, importance, reduce, Center, effort, Jayant Patil arraignment,