Sun, Jun 16, 2019 12:11
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालयात १०९ वा लोकशाही दिन साजरा

मंत्रालयात १०९ वा लोकशाही दिन साजरा

Published On: Aug 06 2018 5:38PM | Last Updated: Aug 06 2018 5:38PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

मंत्रालयात आज १०९ वा लोकशाही दिन साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्‍य साधून मुंबई, उल्हासनगर, वाशीम, नाशिक, उस्मानाबाद, शहापूर, शिरूर, वैजापूर, परतूर येथील नागरिकांच्या १२ विविध तक्रारींवर सुनावणी करण्यात आली. 

क्षेत्रीय यंत्रणेने तक्रारदारांच्या अर्जावर माहिती देताना स्थळ पाहणी करूनच वस्तुनिष्ठ माहिती दिली पाहिजे. लोकांना न्याय देण्यासाठी आपली यंत्रणा असताना त्या भावनेने काम करावे, असे मुख्यमंत्र्यांनी शहापूर येथील सीताबाई तरणे या महिलेच्या तक्रारीवर सुनावणी करताना सांगितले. ग्रामपंचायत निधीतून बोअरवेल मधून पाणीपुरवठा करण्याकरिता सीताबाई यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या शेतातून पाईपलाईन टाकल्यामुळे त्यांना नांगरणी करता येत नाही अशी तक्रार करण्यात आली होती. 

उस्मानाबाद येथील सुभद्रा शेळके यांनी मुलाच्या मृत्यू बाबत सीआयडी चौकशीची मागणी केली होती, त्यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिले. 

शिष्यवृत्तीसाठी डीबीटी पोर्टलमध्ये मुक्त विद्यपीठाचा समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. अंधेरी येथील विनोद बाक्कर या विद्यार्थ्याने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ऑफ्लाईन अर्ज केला होता. त्या संदर्भात केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. शिवाय शिष्यवृत्ती विद्यार्थी आणि महाविद्यालयाच्या खात्यावर जमा करूनही महाविद्यालयाने सदर विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले असल्यास महाविद्यालयांकडून शुल्क परत घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.