Wed, Mar 27, 2019 04:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जातवैधता मुदतवाढ लांबणीवर, पुढील बैठकीत निर्णय शक्य

जातवैधता मुदतवाढ लांबणीवर, पुढील बैठकीत निर्णय शक्य

Published On: Sep 12 2018 2:07AM | Last Updated: Sep 12 2018 2:07AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

राखीव जागावरून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी सहा महिने मुदतवाढ देण्यासबंधीचा प्रस्ताव मंगळवारी ऐनवेळी मंत्रिमंडळाला सादर करण्यात आल्याने तो राखून ठेवण्यात आला. विषयपत्रिकेवर नसताना हा प्रस्ताव चर्चेला आल्याने तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजूला ठेवल्याची माहिती सुत्रांनी दिली. आता पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मुदतवाढीसंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे. 

जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आणखी सहा महिने मुदतवाढ देऊन राखीव जागांवरून निवडणूक लढणार्‍या लोकप्रतिनिधींना दिलासा देण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. त्यासंदर्भातील प्रस्ताव नगरविकास विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ऐनवेळी सादर करण्यात आला. विषयपत्रिकेवर हा विषय नव्हता. त्यामुळे या प्रस्तावावर निर्णय टळला. जातवैधतेसाठी आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव असला तरी या सहा महिन्यात तरी जातवैधतेची प्रकरणे निकाली निघतील का? याबाबत साशंकता आहे. त्यामुळे हा कालावधी वाढवावा, असा सूर विधी व न्याय विभागाचा आहे. त्यावर मंत्रिमंडळातच निर्णय होणार आहे. 

निवडून आल्यानंतर सहा महिने झाली तरी राज्यभर जातवैधतेची प्रकरणे निकाली निघालेली नाहीत. त्यातच अनेक प्रकरणात विरोधी उमेदवारींनी तक्रारी केल्याने त्यांची न्यायिक पध्दतीने सुनावणी सुरू आहे.