Tue, Nov 20, 2018 19:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लालपरी होणार एक मे पासून कॅशलेस

लालपरी होणार एक मे पासून कॅशलेस

Published On: Apr 26 2018 2:00AM | Last Updated: Apr 26 2018 1:14AMमुंबई :

एस.टी. महामंडळदेखील येत्या 1 मे महाराष्ट्रदिनापासून कॅशलेस स्मार्ट कार्ड आणत आहे. एस.टी.च्या चालक आणि प्रवाशांमध्ये सुट्या पैशांवरून अनेकदा वाद होतात. त्यामुळे एस.टी. महामंडळाने ही योजना आणली आहे. प्रवाशांना 50 रुपयांचे स्मार्ट कार्ड घेऊन त्यावर सुरुवातीला किमान  500 रुपये इतकी रक्‍कम भरणे आवश्यक आहे. त्यानंतर पुनर्भरणा रक्‍कम ही  100 रुपयांच्या पटीत उपलब्ध असेल. याद्वारे त्या रकमेइतका एस.टी.चा कोणताही (साधी, रातराणी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी व अश्‍वमेध बसेस) प्रवास करणे शक्य होणार आहे.  हे स्मार्ट कार्ड एका व्यक्‍तीने काढले, तरी त्याच्या कुटुंबातील व मित्रांपैकी कोणीही प्रवासाला जाताना हे कार्ड वापरू शकतात. हे कार्ड नंतर पुनर्भरणा (रिचार्ज) करण्याचीसुद्धा सोय असून, घरबसल्यादेखील ऑनलाईन रक्‍कम या कार्डवर भरणा केली जाऊ शकते.