Wed, May 22, 2019 14:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शहांच्या बकेटलिस्टमध्ये भाजप कार्यकर्ता वेटींगवर; राज ठाकरेंचा चिमटा

शहांच्या बकेटलिस्टमध्ये भाजप कार्यकर्ता वेटींगवर; राज ठाकरेंचा चिमटा

Published On: Jun 06 2018 6:47PM | Last Updated: Jun 06 2018 6:58PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

भाजप अध्यक्ष अमित शहा आजपासून मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या भेटीवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून निशाणा साधला. मुंबई दौऱ्यात अमित शहांनी अभिनेत्री माधुरी दीक्षितचीही भेट घेतली. याचाच आधार घेत राज ठाकरे यांनी अमित शहांच्या भेटीची बकेटलिस्ट शेअर केली आहे. या लिस्टमध्ये अभिनेते, कलाकार, खेळाडू यांचा समावेश असून भाजपच्या कार्यकत्यांना मात्र स्थान नसल्याचे राज ठाकरे यांनी व्यंगचित्रात दाखवले आहे. 

व्यंगचित्रामध्ये अमित शहांच्या हातात एक लिस्ट असून त्यात माधुरी दीक्षित, लता मंगेशकर, धावपट्टू मिल्खासिंग, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची नावे आहेत. मात्र, या लिस्टमध्ये नाव नसलेला एक भाजप कार्यकर्ता अमित शहांच्या समोर केविलवाणा चेहरा करुन उभा असल्याचे राज ठाकरे यांनी व्यंगचित्रात दाखवले आहे. यातून राज यांनी भाजप कार्यकर्त्यांपेक्षा प्रसिद्ध लोकांनाच महत्त देत असल्याचे रेखाटले आहे. 

अमित शहा मुंबईत दाखल झाल्यावर त्यांनी थेट आमदार आशिष शेलार यांचे घर गाठले. तसेच यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आशिष शेलार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर शहा ‘बकेटलिस्ट’फेम माधुरी दीक्षितच्या भेटीला रवाना झाले. 

No automatic alt text available.

२०१९ निवडणुकीच्या पार्शवभूमीवर भाजप सरकारने गेल्या चार वर्षात केलेली कामे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी एक विशेष कॅम्पेनची तयारी करत आहे. त्यासाठी लोकप्रिय कलाकारांच्या मदतीने जनतेपर्यंत कामे पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे असे समोर आले.