Thu, Jul 18, 2019 10:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पिस्तूल बाळगणे म्हणजे गुन्हा नव्हे : उच्च न्यायालय

पिस्तूल बाळगणे म्हणजे गुन्हा नव्हे : उच्च न्यायालय

Published On: Dec 13 2017 9:31AM | Last Updated: Dec 13 2017 9:31AM

बुकमार्क करा

मुंबई :  प्रतिनिधी 

केवळ पिस्तूल वा काडतुसे जवळ बाळगणे हा गुन्हा नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये हत्यार बाळगणे ही संकल्पना ही ठरवून जाणूनबुजून यासाठी वापरली जाते.

त्यामुळे कायद्याने केवळ शस्त्रास्त्रे जवळ बाळगणे हा गुन्हा ठरू शकत नाही, असे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने नमूद करून चार वर्षांपूर्वी शस्त्रास्त्रे प्रतिबंधक कायद्यानव्ये अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकाला मोठा दिलासा दिला. त्याच्या विरोधातील गुन्हा रद्द केला.