Sun, May 26, 2019 10:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेरामध्ये ऑनलाईन कागदपत्रे जमा करता येणार

रेरामध्ये ऑनलाईन कागदपत्रे जमा करता येणार

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 13 2018 12:33AMमुंबई : प्रतिनिधी

रियल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅक्टने (रेरा) गृहखरेदीदारांना आणखी एक दिलासा दिला आहे. रेरामध्ये तक्रार दाखल करायची असेल तर महारेराच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार दाखल करावी लागते. तसेच तक्रार केलेली कागदपत्रे रेराच्या कार्यालयात जमा करावी लागतात. ग्राहकांना रेरा कार्यालयात जावे लागू नये म्हणून रेराने तक्रार आणि त्यासंबंधीची कागदपत्रे ऑनलाईन जमा करता येणार आहेत.

रेरा अधिकार्‍यांनी सांगितले की, तक्रार केल्यानंतर संबंधित कागदपत्रे कार्यालयात जमा करावी लागतात. कागदपत्रे जमा केल्याशिवाय विकासकांना नोटीस पाठवणे शक्य नाही, पण यामध्ये ग्राहकांचा बराच वेळ वाया जातो. तसेच येण्या- जाण्याचा त्रासही होतो. यावर उपाय म्हणून रेराने ही सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच कागदपत्रांसोबत 5 हजार फी ही ऑनलाईन जमा करता येणार आहे. तसेच विकासकाला नोटीसही पाठवावी लागणार नाही. कारण ग्राहक ज्या प्रकल्पाची तक्रार करेल त्याची माहिती विकासकाला नोंदणी केलेल्या प्रकल्पात पाठवण्यात येईल. तसेच विकासकाला एसएमएस पाठविण्यात येईल. यामुळे नोटीस पाठवण्याचा खर्च आणि वेळ वाचणार आहे.