Wed, Aug 21, 2019 17:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कॅम्पस निवडणुकांचे वेळापत्रक ३१ पर्यंत  

कॅम्पस निवडणुकांचे वेळापत्रक ३१ पर्यंत  

Published On: Jul 18 2019 1:56AM | Last Updated: Jul 18 2019 1:41AM
मुंबई : प्रतिनिधी 

तब्बल 28 वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये खुल्या पद्धतीने निवडणुका होणार असल्याचे निश्चित झाले असून, 31 जुलैपर्यंत या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या सर्व विद्यापीठाचे प्र कुलगुरु, स्टुडंट वेल्फेअर, आणि राज्य सरकारचे अधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला. 

कॉलेज व विद्यापीठ परिसरामध्ये अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, आरक्षित संवर्ग प्रतिनिधींची निवड विद्यार्थ्यांना थेट मतदानाद्वारे करता येणार आहे. तर, विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकार्‍यांची निवड चार कॉलेज प्रतिनिधी करतील.या संदर्भात झालेल्या बैठकीत बुधवारी निवडणुकांसाठीचे नियम, ते लागू करण्यातील अडचणी आणि त्यावरील उपाय अशी विस्तृत चर्चा झाली. शेवटी 31 जुलै पूर्वी सर्व विद्यापीठांनी निवडणुक कार्यक्रम जाहीर करावा आणि 30 सप्टेंबरपूर्वी विद्यापीठाचा अध्यक्ष निवडला पाहिजे असे बैठकीत ठरले.