Thu, Apr 25, 2019 03:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच्या मार्गात केबल

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच्या मार्गात केबल

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 12 2018 1:46AM

बुकमार्क करा
ठाणे : खास प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले. घोडबंदर येथील वर्सोवा पूल व भाईंदरमधील अन्य विकासकामांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरने भाईंदरला आले होते. हेलिकॉप्टर ज्या सेव्हन इलेव्हन शाळेच्या हेलिपॅडवर उतरणार होते, त्या मार्गावर पायलटला वायर दिसली आणि त्यांनी पुन्हा टेकऑफ केले. त्यामुळे संभाव्य अपघात टळला. काही वेळाने पायलटने दिशा बदलून त्याच ठिकाणी हेलिकॉप्टर उतरविले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत ग्राऊंड इंजिनिअरला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. 

दरम्यान, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. हेलिकॉप्टर सरळ वर उचलले तर त्यासाठी वजन कमी असावे लागते, असे पायलटने सांगितले. त्यानंतर हेलिकॉप्टरऐवजी रोडने मुख्यमंत्री मुंबईला रवाना झाले. 

मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दुपारी एकच्या सुमारास मुंबई येथील एक कार्यक्रम आटोपून हेलिकॉप्टरने भाईंदरच्या सेव्हन इलेव्हन शाळेत उतरणार होते. त्यावेळी शाळेच्या इमारतीतून दुसर्‍या इमारतीवर केबलची गेलेली वायर हेलिकॉप्टर उतरत असताना हेलिकॉप्टर पायलटला दिसली. पायलटने हेलिकॉप्टर लँड होत असताना ते पुन्हा टेकऑफ केले. हेलिकॉप्टर खाली आले असते तर हेलिकॉप्टरच्या पंख्यात वायर अडकून अनर्थ घडू शकला असता. या घटनेनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. मुख्यमंत्र्यांच्याच हेलिकॉप्टरच्या बाबतीत वारंवार असे का घडते, असा सवाल उपस्थित करण्यात आला.