Sun, Jul 21, 2019 07:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीमेवर दोन्ही पाय गमावलेला जवान घरी परतला

सीमेवर दोन्ही पाय गमावलेला जवान घरी परतला

Published On: Jun 18 2018 1:10AM | Last Updated: Jun 18 2018 12:47AMजव्हार ः वार्ताहर

छत्तीसगडच्या सीमेवर  भूसुरूंगाच्या स्फोटात दोन्ही पाय गमावलेला सीआरपीफ जवान रामदास भाऊ भोगाडे (29) अलिकडे तालुक्यातील वडोलीपैकी रातूना गावातील आपल्या घरी परतला. त्याचे जव्हार तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले. पत्नी, 2 मुले, आई, वडील आदी सदस्य त्याच्या कुटुंबात असून त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची आहे. स्फ ोटामुळे त्याचे दोन्ही पाय निकामी झाल्याने  भोगाडे कुटुंब काळजीत आहे.

रामदास भोगाडे गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी छत्तीसगड सीमेवर आपल्या टीमसोबत गस्त घालत होता. त्याचा पाय भूसुरूंगावर पडल्यामुळे झालेल्या स्फोटात त्याला  दोन्ही पाय गमवावे लागले. त्याच्यावर छत्तीसगडच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. तो गेल्या आठवड्यात आपल्या गावी पोहोचला तेव्हा त्याचे जोरदार स्वागत करण्यात 
आले. 

रामदासची तब्बेत ठणठणीत व्हावी यासाठी तालुक्यातून प्रार्थना करण्यात येत होती. सुदैवाने  त्याची तब्बेत ठणठणीत झाली तसेच त्याला कृत्रिम पायदेखील बसवण्यात आले. तब्बल 8 महिन्यांनी तो घरी परतलाअसून आता कृत्रिम पायांवर काठीचा आधार घेऊन चालू लागला आहे. छत्तीसगडच्या नक्षल्यांच्या प्रभावाखाली असलेल्या परिसरात आमची टीम फिरत असताना माझा पाय अचानक भूसुरूंगावर पडला. हे माझ्या लक्षात येताच  मी माझ्या साथीदारांना सतर्क केले व तात्काळ दूर जाण्यास सांगितले. 

साथीदार सुरक्षित अंतरावर जाताच मी भूसुरूंगावरील पाय उचलला आणि त्याच क्षणी स्फ ोट होऊन मी जमिनीवर कोसळलो. मी त्यानंतर 15 मिनिटे गुरासारखा ओरडत होतो. माझ्याजवळ फक्त दोनच जवान आले, कारण अधिक जवान आले तर त्यांचाही पाय पडून स्फ ोट होवू शकण्याची भीती होती. परिसरातील पालापाचोळ्यातही बॉम्ब ठेवलेले होते, असा मोठा थरारक अनुभव रामदास भोगाडेने यांनी पुढारी प्रतिनिधीला ऐकवला.