Thu, Feb 21, 2019 13:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › LIVE : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार : मुख्यमंत्री 

LIVE : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार : मुख्यमंत्री 

Published On: Jul 29 2018 4:12PM | Last Updated: Jul 29 2018 4:23PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

गेल्या दोन आठवड्यापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्य पेटले आहे. महाराष्ट्रातील विविध भागात या मागणी ठिय्या आंदोलने सुरु आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदलकांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार मुख्यमंत्री व आंदोलकांसोबत सह्याद्री अतिथी गृहावर बैठक पार पडली. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील पण पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अभय दिले जाणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले मुख्यमंत्री.....

-मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक
- पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना माफी नाही
- मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील
- मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल आल्यानंतर तत्काळ निर्णय घेतला जाईल 
- मेगा भरतीत मराठा समाजावर अन्याय होणार नाही 
- सर्व घटकांशी चर्चा करण्यासाठी तयार  
- सर्व संघटनांनाकडून सहकार्याची अपेक्षा