Thu, Jun 20, 2019 02:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाकरेंना वेटिंग करायला लागले चुकलेच : मुख्यमंत्री

ठाकरेंना वेटिंग करायला लागले चुकलेच : मुख्यमंत्री

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

विरोधकांच्या हाती सत्ताधार्‍यांवर टीका करण्यासाठी एकही मुद्दा नव्हता. बिनबुडाचे आरोप करुन बदनाम करण्यापेक्षा हिंमत असेल तर, भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे द्यावेत, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले. सत्तारूढ पक्ष विरोधकांच्या पिंजर्‍यात सापडला नाही. या अधिवेशनावर सत्तारूढ पक्षाचाच वरचष्मा राहिला, असा दावाही त्यांनी केला.

अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या समारोपानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांच्यावर झालेल्या आरोपांचे त्यांनी खंडण केले. मुख्यमंत्री म्हणाले, 'निलगेंकरांनी कोणत्याही बँकेकडुन कर्ज घेतले नव्हते. ते जामीनदार असलेल्या कर्जाला बँकेने वनटाईमसेटलमेंट दिली आहे. 

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यांनी कर्जाची परतफेड केली आहे. मंत्रालयात आलेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आ पल्याला न भेटता गेले, याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले, 'आमच्या दोघांची भेटीची वेळ निश्‍चित ठरली होती. पण, आपण सभागृतील कामकाज संपवून येऊ शकत नसल्याचा निरोप त्यांना दिला होता. त्यांना प्रतिक्षा करायला लावणे योग्य नव्हते. आमची दोन-तीन दिवसांत भेट होणार आहे.' या अधिवेशनात सरकारने पुरोगामी अर्थसंकल्प मांडल्याचा दावाही त्यांनी केला. 
 

Tags : BJP, shivsena, devendra fadanvis, uddhav thackeray, uddhav vating


  •