Sat, Feb 23, 2019 03:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खडसेंची नाराजी राणेंसाठी डोकेदुखी?

खडसेंची नाराजी राणेंसाठी डोकेदुखी?

Published On: Feb 17 2018 9:04AM | Last Updated: Feb 17 2018 9:04AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल या अपेक्षेत असलेल्या भाजप नेत्यांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. शिवसेनेचा विरोध आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पक्षांतर्गत नाराजीची झळ काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांना बसली असून त्यांची प्रतिक्षा एवढ्यात संपण्याची शक्यता नाही.

वाचा : शिवसेना मला घाबरते, भाजपने विचार करावा : राणे

राणेंना मंत्रिमंडळात घेण्यास शिवसेनेचा कडाडून विरोध आहे. राणे मंत्रिमंडळात आले तर शिवसेना सरकारमधून बाहेर पडू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत जाण्याचा घेतलेला निर्णय आणि राजकीय हवामानात फरक पडल्याने अन्य पक्षातून वाढीव आमदारांची रसद मिळण्याची शक्यता कमी झाल्याने अशावेळी सरकारलाच धोका निर्माण होउ शकतो. हा धोका मुख्यमंत्री पत्करणार नाहीत. न्यायालयात असलेल्या केसचा निर्णय लागत नाहीतोपर्यंत खडसे यांना मंत्रिमंडळात घेता येणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यात विस्तार करूनही त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाहीतर ते टोकाचा निर्णय घेतील, या शक्यतेने विस्तार आणखीच रखडला.