Sun, Sep 23, 2018 21:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वनगा कुटुंबिय भाजपचं नुकसान होईल असा निर्णय घेणार नाही 

मुख्यमंत्र्यांना वनगा कुटुंबियांवर अजूनही भरवसा!

Published On: May 05 2018 5:26PM | Last Updated: May 05 2018 5:22PMमुंबई : प्रतिनिधी

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या मुलालाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चाही झाली होती. पण, अचानकपणे वनगा कुटुंबातील सदस्यांनी वेगळी भूमिका का घेतली हे माहित नाही, पण चिंतामण वनगा यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत ज्या प्रकारे पक्षाच काम केलं, हे पाहता  भाजपाच नुकसान होईल, असा निर्णय निवडणुकीत वनगा कुटुंबिय घेणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे कुटुंबियांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या 35 वर्षात चिंतामण वनगांनी भाजप पक्ष वाढवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. भाजप पक्षाच्या नेत्यांनी आमच्या अन्याय केला आहे. वनगा कुटुंबातील सदस्यना वाऱ्यावर सोडून दिले आहे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे याच्याकडे वेळ मागितला होता. पण त्यांनी आम्हाला वेळ दिली नाही, आम्ही भाजप सोडत आहोत. आमचे शिवसेनेबरोबर नात आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नेहमी सहकार्य केले आहे, अशी भावना वानगा कुटुंबियांनी घेतली होती.