Fri, Sep 21, 2018 05:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिडको अध्यक्षपदाच्या आमिषाने झोजवालांना घातला ७ कोटींचा गंडा

सिडको अध्यक्षपदाच्या आमिषाने झोजवालांना घातला ७ कोटींचा गंडा

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 1:01AMकल्याण : वार्ताहर

कल्याणमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आसिफ झोजवाला (56) यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी राहत्या घरी आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असतानाच त्यांच्या पत्नीने झोजवाला यांना सिडकोचे चेअरमनपद देण्याचे आमिष दाखवून त्यांना सात कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला व त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार मंगळवारी महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल केल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.   

आसिफ झोजवाला (56) हे कल्याणमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक. त्यांनी 5 मार्च 2018 रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. दरम्यान, संजय घोष व प्रवीण सिंग यांनी झोजवाला यांना सिडकोचे चेअरमन पद देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून सात कोटी उकळले होते. मात्र पद न मिळाल्याने झोजवाला यांनी त्यांना जाब विचारला असता या दोघांनी त्यांना मानसिक त्रास दिला. याच त्रासातून झोजवाला यांनी आत्महत्या केल्याचा आरोप झोजवाला यांच्या पत्नीने केला आहे. पोलिसांनी या दोन्ही भामट्यांविरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.