Sun, May 19, 2019 22:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रायगडावर आढळल्या शिवकालीन वस्तू, पाहा फोटो

रायगडावर आढळल्या शिवकालीन वस्तू, पाहा फोटो

Published On: Mar 25 2018 4:22PM | Last Updated: Mar 25 2018 4:37PMमहाड : श्रीकृष्ण द.बाळ

सुमारे 340 वर्षापूर्वी चार मोगली आक्रमकांसह पोर्तुगीज, सिद्धी व डच यांच्या आक्रमणाला सामोरे जाऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या किल्ले रायगडवर ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत. हिंदवी स्वराज्यच्या  राजधानीच्या ठिकाणी महाराष्ट्र शासन मार्फत स्थापन करण्यात आलेली रायगड प्राधिकरण व पुरातत्व खात्याच्या मार्गात सुरु असलेल्या उत्खननामध्ये अनेक ऐतिहासिक दस्ताएवज तसेच काही वस्तू सापडल्या आहेत. या सर्व वस्तूंच्या पाहणीसाठी गडावर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी शिवभक्तांकडून करण्यात येत आहे. ज्या 32 मण सिंहासनावर बसून छत्रपती शिवरायांनी  राज्यकारभार केला. त्या सिंहासनचा आज 340 वर्षानंतरही शोध लागू शकलेला नाही.

महाराष्ट्र शासनामार्फत दोन वर्षापूर्वी रायगड महोत्सवाच्या माध्यमातून छत्रपतींच्या राजधानीचे ठिकाणी असलेल्या रायगडाच्या संवर्धनाबाबत पहिले पाऊन उचलले होते. मागील वर्षी रायगड संवर्धन योजनेसाठी 600 कोटी रुपयांची तरतूद करून महिन्यापूर्वी छ. खा. संभाजी राजे यांची रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यानंतर या संवर्धन मोहिमेने वेग घेतल्याचे प्रत्यक्ष भेटीअंती दिसून आले आहे.

No automatic alt text available.

या संदर्भात किल्ले रायगडावर जाण्याचा प्रमुख मार्ग असलेल्या महादरवाजा ते होळीचामाळ या मार्गावरील पदपथाची (पायऱ्यांची) दुरुस्तीचे काम प्राथमिक अवस्थेत सुरु झाले आहे. याचबरोबर श्री जगदीश्वर मंदिर व छ. शिवरायांच्या समाधी स्थानाची रासायनिक पद्धतीने दुरुस्तीचे काम सुरु झाल्याचे दिसून आले. गडावरील विविध भागात असणाऱ्या घरांच्या उत्खननाबबत प्राधान्याने काम हाती घेण्यात आले असून, ब्राह्मणवाडीतील सरदारांची या दुरुस्तीच्या कामामध्ये सुरुवात करण्यात आली आहेत. गेल्या अनेक वर्षानंतर प्रथमच गडावर अशा पद्धतीचे थेट उत्खनन केले जात असून, या दरम्यान गंगासागर तलाव, हत्ती तलाव, दारूकोठा, आदि परिसरातून तोफांकरिता वापण्यात येणारे गोळे आढळून आले आहे. तसेच भग्न झालेल्या मूर्तींचे अवशेष घरांतील विविध वापरायच्या वस्ती, कडी, कोयती, साखळी, साखळदंड, आदींचा यामध्ये समावेश आहे. होळीचामाळ ते श्री जगदीश्वर पर्यंतच्या कामात वेग आल्याचे या भेटीदरम्यान निदर्शनास आले.

No automatic alt text available.

यामुळे किल्ले रायगडावरील पुरातत्व खात्याने अधिक जागरूकपणे या कामांकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. गडावरील गंगासागर तलाव, हत्ती तलाव, कोलींब तलाव, हनुमान टाकी या ठिकाणच्या स्वच्छता व दुरुस्तीचे काम तसेच पाण्याची आरोग्यदृष्ट्या तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी सामाजिक संस्थांनी केलेल्या सफाईदरम्यान या तलावांतून अनेक वस्तू सापडून आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर तसेच ज्या 32 मण सिंहासनावर अनसुन छ. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा कारभार पहिला त्या सिंहासनचा शोध आज 340 वर्षानंतरही दुर्दैवाने लागलेला नाही. हे लक्षात घेता घडवरील सुरु असलेल्या या सर्वात मोठ्या संवर्धन मोहिमेवर सीसीटीव्ही यंत्रणेमार्फत नियंत्रण ठेवण्याची मागणी शिवभक्तांकडून केली जात आहे.

Image may contain: food

रायगड संवर्धना संदर्भात प्राधिकरण अध्यक्ष खा. संभाजी राजे छत्रपती यांनी गडावरील संवर्धनाकामी तेथील दगडांचा वापर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केल्याने भविष्यात गडावर निर्माण होणाऱ्या वास्तू या शिवकालीन स्वरूपातील असणार आहेत. यामुळे या सर्व कामांवर पुरातत्व खाते व प्राधिकरणाचे अधिकारी बारकाईने लक्ष ठेवीत असल्याचे दिसून आले आहे. आगामी काळात किल्ले रायगडावरील संवर्धनाचे काम गडासह पायथ्याजवळील गावांमधून होणार आहे. याबाबत शासनाने निर्माण केलेला आरखडा नव्याने निर्माण करण्याचे आदेश खा. संभाजी राजे यांनी दिल्याने स्थानिक नागरिकांच्या असणाऱ्या मागण्यांची पूर्तता नियोजनबद्ध काळात होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

No automatic alt text available.

वरील तीन ठिकाणी सुरु असलेल्या कामांसह अन्य कामांसाठी 600 कोटी पैकी 60 कोटी रुपये जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे यापूर्वीच वर्ग करण्यात आले आहे. यामुळे गडावरील सुरु असलेया असलेल्या कामांसह अन्य कामांही वेग प्राप्त होण्याचे संकेत दिसून येत आहेत. गडावरील कामांकरिता पुरातत्व खात्याच्या जेष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कामे केली जात असून, अन्य कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राधिकरणाअंतर्गत कामे केली जाणार आहेत. यामध्ये नातेखिंड ते रायगड, पाचाड, राजमाता यांचा वाडा पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरणाचा प्रस्ताव असून, यासाठी केंद्रशासनाने 200 कोटीची तरतूद केली आहे.

No automatic alt text available.

रायगड संवर्धन योजनेअंतर्गत परीसातील गावांच्या किमान नागरी सुविधा, जलयुक्त शिवार योजना आदींमधून पूर्ण करण्यात येणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून किल्ले रायगडावरील या घरांच्या उत्खननाचे काम पाहण्यासाठी गडावर येणाऱ्या शिवभक्तांमध्ये मोठी उत्सुकता पहावयास मिळाली. जुन्या बांधकामातून मिळणाऱ्या वस्तू  या ऐतिहासिक असल्याने त्यांच्या समवेत अनेक नागरिकांनी त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यामुळेच एकूणच शासनाच्या योजनेनुसार छ. शिवरायांच्या किल्ले रायगडवर रायगड संवर्धन मोहिमेने तीन प्रमुख ठिकाणी सुरु केलेले काम वेगाने प्रगतीपथावर जात असल्याचे दिसून आले आहे.

Image may contain: one or more people, outdoor and nature

Tags :  CCTV Demand,  Raigad Fort,  Historical Documents,  Archeology Department