होमपेज › Mumbai-Thane-Raigad › PNBच्या मुंबईतील ब्रँडी हाऊस शाखेला सील 

PNBच्या मुंबईतील ब्रँडी हाऊस शाखेला सील 

Published On: Feb 19 2018 11:52AM | Last Updated: Feb 19 2018 11:53AMमुंबई: पुढारी ऑनलाईन

नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्यामुळे चर्चेत आलेली पंजाब नॅशनल बँकेची मुंबईतील ब्रँडी हाऊस शाखा आज (सोमवारी) सील करण्यात आली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या शाखेमध्ये येण्यास सर्वांवर बंदी घातली आहे. पीएनबीची ही तिच शाखा आहे जेथून 11 हजार 500 कोटींचा घोटाळा झाला होता. 

वाचा: पीएनबी प्रकरण :‘त्या’ मोबदल्यात मिळत असे कमिशन!

याआधी रविवारी सीबीआयने ब्रँडी हाऊस शाखा स्वत:च्या ताब्यात घेतली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयने बँकेच्या महाव्यवस्थापक स्तरावरील अधिकाऱ्यांसह पाच अन्य अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. दुसरीकडे या घोटाळ्याप्रकरणी मोदीच्या कंपनीचा दुसरा मुख्य फायनान्स ऑफिसर रवी गुपात याला चौकशीसाठी हजर होण्याचे समन्स पाठवण्यात आले आहे.  सीबीआयने कंपनीचे अन्य एक सीएफओ विपुल अंबानी यांची देखील रविवारी 5 तास चौकशी केली होती. 

15 शहरांमध्ये छापे

ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने रविवारी दिल्लीतील द्वारका येथील गीतांजली ज्वेलर्सच्या शोरुमसह 15 शहरात छापे मारले होते. यात भोपाळ, रायपूर,वडोदरा, चंदीगड, अहमदाबाद, पाटना, गुवहाटी, बेंगळुरू, कोलकाता, लखनऊ, हैदराबाद आणि चेन्नई येथील शोरुम आणि वर्कशॉपचा समावेश होता. 

PNB की ब्रैडी हाउस ब्रांच सील, यहीं से हुआ था 11,300 करोड़ का बैंकिंग घोटाला