Mon, Sep 24, 2018 09:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीए परीक्षेत उल्हासनगरची समीक्षा तिसरी

सीए परीक्षेत उल्हासनगरची समीक्षा तिसरी

Published On: Jul 21 2018 1:31AM | Last Updated: Jul 21 2018 12:57AMमुंबई : प्रतिनिधी

सीए परीक्षेत सुरतचा प्रित शाह देशात पहिला आला आहे. त्याला 800 पैकी 542 गुण मिळाले तर तर बंगळुरूचा अभिषेक नागराज दुसरा आला आहे. त्याला 539 गुण मिळाले आहेत मुंबई एमएमआर क्षेत्रातील उल्हासनगर येथील समीक्षा अग्रवाल देशात तिसरी आली असून तिला 524 गुण मिळाले आहेत.

दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस ऑफ इंडियाच्या वतीने (आयसीएआय) मे मध्ये घेण्यात आलेल्या सीए फायनल आणि फाऊंडेशन परीक्षेचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. यंदा सीएची परीक्षा जुना अभ्यासक्रम आणि नवा अभ्यासक्रम अशा दोन विभागात झाली आहेती. जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल 9.09 टक्के इतका लागला आहे तर नव्या अभ्यासक्रमाचा निकाल 9.83 टक्के इतका लागला आहे.

सीएबरोबरच सीपीटी आणि फाऊंडेशन परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात आला असून तो अनुक्रमे 28.06 आणि 19.24 टक्के इतका लागला आहे. सीएमध्ये परीक्षेतील नव्या अभ्यासक्रमाची 936 विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रुपची परीक्षा दिली होती. यापैकी 92 विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. यात सुतरचा प्रित शाह देशात पहिला आला आहे. तर बंगळुरूचा अभिषेक नागराज दुसरा आणि उल्हासनगर येथील समीक्षा अग्रवाल देशात तिसरी आली आहे.  

जुन्या अभ्यासक्रमाची 27 हजार 727 विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रुपची परीक्षा दिली होती. यापैकी 2520 विद्यार्थी दोन्ही ग्रुप उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत जयपूरचा अतुल अग्रवाल देशात पहिला आला आहे. अहमदाबार येथील संदीप दलाल दुसरा तर सुरत मधील अनुराग बगारिया तिसरा आला आहे. सीपीटी परीक्षेचा निकाल 28.26 टक्के इतका लागला आहे. तर फाऊंडेशनचा निकाल 19.4 टक्के इतका लागला आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरातून जुन्या अभ्यासक्रमातून 9 हजार 104 विद्यार्थी तर नव्या अभ्यासक्रमातून 139 विद्यार्थी सीए झाले आहेत.