Fri, Sep 21, 2018 09:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नालासोपार्‍यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नालासोपार्‍यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Published On: Dec 13 2017 2:36AM | Last Updated: Dec 13 2017 1:44AM

बुकमार्क करा

नालासोपारा : वार्ताहर

नालासोपारा पूर्वेतील वैतीवाडी येथे बायको आणि बहिणीकडून देहव्यापार करून घेणार्‍यासह अन्य आरोपीला तुळींज पोलिसांनी अटक केली. या कारवाईत 3 पीडितांची सुटका करण्यात आली आहे.

नालासोपार्‍यात आचोळे येथे राहणारा मुख्य आरोपी आणि त्याचा साथिदार राजू अमीन पुतुमी हे मुख्य आरोपीची बायको, बहिण आणि एका अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने देहव्यापार करून घ्यायचे. राजू पुतुमी गिर्‍हाईक आणून द्यायचा. त्याला मुख्य आरोपी कमिशन देत असे. पती-पत्नी आणि बहिण-भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावण्याच्या या प्रकाराची खबर अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळाली. त्यांनी सोमवारी बनावट गिर्‍हाईक पाठवून त्यांना तिथे पोहोचल्यावर मिस कॉल द्यायला सांगितला. त्या व्यक्तीने मिस कॉल देताच एक अल्पवयीन मुलगी, आरोपीची बायको तसेच बहिण अशा तिघांची सुटका करण्यात आली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.