Mon, Dec 17, 2018 15:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बंटी-बबलीचा गृहिणींना 65 लाखांचा गंडा!

बंटी-बबलीचा गृहिणींना 65 लाखांचा गंडा!

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:24AMधारावी : वार्ताहर

अँटॉपहील परिसरात भाड्याने राहणार्‍या एका नवदाम्पत्याने परिसरातील महिलांना  65 लाख रुपयाचा गंडा घालून पोबारा केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अ‍ॅण्टॉप हील पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक टि. के. कोरडे यांनी कमिशनच्या हव्यासापोटी मध्यस्थी करणार्‍या एका महिलेला अटक केली.

अ‍ॅण्टॉप हीलच्या कोकरी आगार परिसरात गेल्या काही महिन्यांपूर्वी एक दाम्पत्य राहायला आले होते. त्यांनी प्रेमळ स्वभावाचे नाटक करून शेजारी राहणार्‍या रहिवाशांची मने जिंकली. संधी साधून परिसरातील महिलांना मोठ्या व्याजाचे आमिष दाखवले. परिसरातील 12 पेक्षा जास्त महिलांनी मोठ्या आशेने कुटुंबाला याची कानोकान खबर न लावता 65 लाख रुपये या दाम्पत्याला दिले. सुरुवातीचे काही महिने त्यांना व्याज मिळाले. त्यातच काही महिलांनी व्याजासह पैसे परत मागण्याचा तगादा लावल्याने दाम्पत्य घाबरले व त्यानी रकमेसह पलायन केले.