Tue, Jan 22, 2019 17:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बळकावलेल्या जागेवर इमारत बांधून रहिवाशांची फसवणूक

बळकावलेल्या जागेवर इमारत बांधून रहिवाशांची फसवणूक

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 2:08AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

बळकावलेल्या जागेवर इमारत बांधून ती रहिवाशांना भाडे तत्त्वावर देत त्यांची तब्बल 22 लाख 50 हजार रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कुर्ल्यामध्ये समोर आला आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून चुनाभट्टी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

कुर्ला पूर्वेकडील कुरेशीनगरमध्ये एका मोकळ्या जागेवर दोन जणांनी झायका मंझील इमारतीचे बांधकाम केले. त्यानंतर मार्च 2014 पासून इमारतीमधील फ्लॅट लाखो रुपयांचे डिपॉझिी घेत पाच जणांना राहाण्यासाठी दिले. इमारत अनधिकृत असल्याचे माहिती नसल्याने, तसेच इमारत बांधणार्‍याचे तळमजल्यावर दुकान असल्याने त्याच्यावर विश्‍वास ठेऊन रहिवाशांनी पेैसे भरत फ्लॅट भाडेतत्त्वावर घेतले. मात्र प्रशासनाकडून इमारतीला कारवाईच्या नोटिसा येऊ लागल्याने रहिवासी घाबरले. भाडेतत्त्वावर फ्लॅट देणार्‍या व्यक्तिला याबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. फसल्या गेलेल्या पाचही रहिवाशांनी अखेर चुनाभट्टी पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. जमाल अन्सारी (36) यांच्या तक्रारीवरून इमारतीचे बांधकाम करणार्‍या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.