Sat, May 25, 2019 23:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › Budget live : ३२ हजार नव्या करदात्यांची नोंदणी

Budget live : ३२ हजार नव्या करदात्यांची नोंदणी

Published On: Mar 09 2018 2:13PM | Last Updated: Mar 09 2018 3:51PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी २०१८-१९ चा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. यंदाचा त्यांचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. राज्याच्या चौथ्या अर्थसंकल्पात  कृषी क्षेत्रावर अधिक भर देण्यात आला आहे. केंद्राप्रमाणेच राज्याच्या अर्थसंकल्पातही शेतक-यांचे उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. चौथा अर्थसंकल्प सादर करणे अभिमानास्पद असल्याचे सांगत मुनगंटीवारांनी अर्थ संकल्प सादर केला. 

लाईव्ह अपडेट

*सभागृहाचे या दिवसाचे कामकाज संपले 

*जीएसटी लागू झाल्यापासून राज्यात ३२ हजार नव्या करदात्यांची नोंदणी 

*अर्थसंकल्पाचा भाग दुसरा सादर करण्यास सुरुवात 

*सातव्या वेतन आयोगाबाबात कोणतीही घोषणा नाही 

*लांज्यात नवीन पर्यटन स्थळ 

*पु.ल देशपांडे आणि गदिमांच्या शताब्दीसाठी ५ कोटींचा निधी 

*सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी १० कोटी 

*गणपतीपुळे विकासासाठी २० कोटी

*रामटेकच्या विकासासाठी २५ कोटींची तरतूद 

*२ रुपये किलो तांदूळ आणि ३ रुपये किलो गहू 

*राज्यभर अहिल्याबाई होळकर सामाजिक सभागृहे बांधणार, ३० कोटींची तरतूद 

*राज्यभर अनुसुचीत जातीसाठी ९९४९ कोटींची घोषणा 

* काथ्या उद्योगासाठी १० कोटीचा निधी

* सिंधुदुर्गात मल्टिस्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारणार, निधीची घोषणा मात्र नाही 

*कोकणातील खार बंधाऱ्यासाठी ६० कोटींचा निधी 

* स्मार्टसिटी योजनेसाठी १ हजार ३१६ कोटी

* घनकचरा १ हजार ५२६ कोटींची तरतूद

* १५ हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना या विशेष योजनेचा लाभ घेता येईल

* सांडपाणी नियोजनासाठी विशेष योजना, मुख्यमंत्री सांडपाणी योजनेसाठी ३३५ कोटी

* न्यायालयांच्या इमारतीसाठी ७०० कोटींची तरतूद

* कृषीवाहिनीअंतर्गत १२ तास वीज मिळणार

* वीज निर्मितीसाठी ४०४ कोटी

* १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उभारणार

* मिहान विमानतळासाठी १०० कोटींची तरतूद

*रस्तेविभागासाठी एकूण  १० हजार ८२८ कोटी

* प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यासाठी ५० कोटींची तरतूद

* अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी ४०० कोटी

*  मागासवर्गीय उद्योजकांसाठी खास तरतूद

* सागरी शिवस्मारकासाठी ३०० कोटींची तरतूद

* बाजार समित्यांमध्ये ई- ट्रेंडिगची सुविधा

* शेतमाल तारण योजनेसाठी ९ कोटींची तरतूद

* धान्य चाळणी यंत्रणेसाठी २५ टक्के अनुदान

*इंदू मीलसाठी १५० कोटींची तरतूद 

* जलयुक्त शिवारासाठी १ हजार ५०० कोटी

* सूक्ष्म आणि लघू उद्योगांना प्राधान्य

* वृक्षारोपणासाठी शेतकऱ्यांना मिळणार ५० टक्के अनुदान