Fri, Sep 21, 2018 03:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एक्स्प्रेसवेवर इनोव्हाच्या भरधाव वेगाने घेतला २ मुंबईकरांचा बळी

एक्स्प्रेसवेवर इनोव्हाच्या भरधाव वेगाने घेतला २ मुंबईकरांचा बळी

Published On: Dec 21 2017 2:10AM | Last Updated: Dec 21 2017 1:08AM

बुकमार्क करा

खालापूर : प्रतिनिधी

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खालापुर जवळ धामनी येथे  भरधाव वेगाने जाणार्‍या इनोव्हा कारचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात 3 ठार तर 6 जण गंभीर जखमी झाले. 
जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. हा अपघात बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला.

मृतांमध्ये इनोव्हामधील अस्मित सुहास तावडे (19) रा.घाटकोपरमुंबई, शुभम गोरखनाथ बोराडे (19) रा.विक्रोळी, यांचा समावेश असून रिट्झ कारमधील  अनंत नरेंद्र पारिख (55) रा.पूणे हे मृत झाले आहेत. या अपघातात शुभम पालांडे, मोहम्मद आदिल शाह, प्रथमेश रांझे, आदित्य आचार्य, शुभम सरोज, सोहेल हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याच्या दिशेने निघालेल्या इनोव्हा कारचा टायर फुटल्याने ही कार डिव्हाडर सोडून दुसर्‍या मार्गावर थेट जावून समोरुन येणार्‍या रिट्झ कारवर आदळून हा अपघात झाला.