Tue, Mar 26, 2019 11:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्तनाचा कर्करोग झालेल्या महिलांवर मोफत उपचार करा

स्तनाचा कर्करोग झालेल्या महिलांवर मोफत उपचार करा

Published On: Jan 19 2018 2:10AM | Last Updated: Jan 19 2018 1:48AMमुंबई :  प्रतिनिधी 

स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) झालेल्या महिलांना सरकारी रुग्णालयात विनामुल्य उपचार केले जावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी लोकसभेत खासगी विधेयक मांडले आहे. सरकारी रुग्णालयात या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. 
स्तनांचा कर्करोगाचा विळखा भारतात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याचे निदान वेळेत झाले तर रुग्णाला वाचवता येते. मात्र महिलांमध्ये याबाबत पुरेशी जनजागृती झालेली नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. या

आजाराने सन 2012 मध्ये सुमारे 70 हजार महिलांचा  मृत्यु झाला.  2020 पर्यंत या आजाराने मृत्यु पावणार्‍यांची संख्या  76 हजारावर पोहोचेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. सुप्रिया सुळेंनी सादर केलेल्या या विधेयकाला ब्रेस्ट कॅन्सर कायदा असे नाव दिले आहे.  या विधेयकाच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी स्तनाच्या कर्करोग झालेल्या महिलांना सरकारी रुग्णालयात मोफत उपचार मिळाले पाहिजेत अशी मागणी केली आहे. 

स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी तपासण्या मोफत उपलब्ध कराव्यात, हा कायदा सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना लागू करावा, केंद्राने ब्रेस्ट कॅन्सरबाबत जनजागृती करावी, शहरी आणि ग्रामीण भागात ही सेवा असावी, सरकारी रुग्णालयांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर पीडित महिलेला मोफत उपचार मिळावेत, हा कायदा झाल्यानंतर सरकारने योग्य आर्थिक तरतूद करावी अशा तरतुदी यामध्ये करण्यात आल्या आहेत.