Thu, Jun 20, 2019 04:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वसई पश्चिमेतील नव्याने बांधलेल्या पुलास भगदाड 

वसई पश्चिमेतील नव्याने बांधलेल्या पुलास भगदाड 

Published On: May 22 2019 1:38PM | Last Updated: May 22 2019 1:38PM
वसई : पुढारी ऑनलाईन 

वसई पश्चिमेतील नव्याने बांधलेल्या पुलावर भगदाड पडल्याची घटना घडलीय. या खड्ड्यामुळे वसईत मोठी खळबळ उडालीय. यानंतर  पुलाच्या बांधकामावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 

यपश्चिमेतील अंबाडी रोड येथे नवीनच बांधकाम करण्यात आलेल्या पुलाला आज (ता.२२) अचानक भगदाड पडल्याची घटना घडली. या घटनेमुळे पुलावरील वाहतुकीस धोका निर्माण झाला असून वाहतूक थांबण्यात आली होती. तसेच पुलाखालून वसई-विरार महापालिकेची पाईप लाईन जात असल्याने भगदाड पडलेल्या ठिकाणची माती सरकली, त्यामुळे त्या ठिकाणी भगदाड पडले. सद्यस्थितीत ते भगदाड बुजवण्याचे काम सुरु आहे.

पुलाला पडलेल्या भगदाडामुळे वाहन धारकांमध्ये असुरक्षितता निर्माण झालीय. तसेच आता पुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पुलाचे निकृष्‍ठ काम करणार्‍या  अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.