Thu, Aug 22, 2019 14:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मिलिंद देवरांकडून आचारसंहितेचा भंग

मिलिंद देवरांकडून आचारसंहितेचा भंग

Published On: Apr 20 2019 1:53AM | Last Updated: Apr 20 2019 1:53AM
मुंबई : प्रतिनिधी

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीचे उमेदवार असलेले मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी प्रथमदर्शनी ठपका ठेवला आहे. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या आदेशानुसार आचारसंहिता प्रमुखांनी एल.टी. मार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देवरांविरोधात आचारसंहिता भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

याआधी मिलिंद देवरा यांनी 2 एप्रिलला शिवसेनेचे उमेदवार खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात जैन समाजास केलेल्या आवाहनाचा व्हिडीयो व्हायरला झाला होता. त्याची तक्रार सनी जैन आणि धमेंद्र मिश्रा यांनी 8 एप्रिलला निवडणूक कार्यालयाला केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत दक्षिण मुंबई लोकसभा मतदासंघाच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी 16 एप्रिलला कुलाबा विधानसभा मतदारंसघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना कार्यवाहीचे आदेश दिले होते. 

या आदेशानुसार गुरूवारी आचारसंहिता प्रमुख व मनपाच्या ए विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी एल.टी.मार्ग पोलिसांना ग्ाुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.मुंबईत लोकसभेच्या उमेदवाराविरुद्ध थेट आचारसंहिता भंग केल्याबद्दल दाखल होत असलेला हा पहिला गुन्हा ठरू शकतो.