Sun, Jul 21, 2019 07:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दुसर्‍या लग्‍नाच्या मुलांचा मालमत्तेवर हक्‍क नाही 

दुसर्‍या लग्‍नाच्या मुलांचा मालमत्तेवर हक्‍क नाही 

Published On: May 16 2018 1:43AM | Last Updated: May 15 2018 8:52PMमुंबई : प्रतिनिधी  

दुसर्‍या लग्‍नापासून झालेली मुले ही पिता जिवंत असताना त्याच्या मालमत्तेवर हक्‍क सांगू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांनी हा निर्वाळा देताना पित्याच्या मृत्यूनंतरच ही मुले मालत्तेवर हक्‍क सांगू शकतात, असेही स्पष्ट  केले.

दुसर्‍या लग्‍नापासून जन्माला आलेल्या मुलाने पित्याच्या मालमत्तेवर दावा करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होता. यावेळी याचिकाकर्त्याने पिता हयात असताना याचिकादार मुलाने त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेतील हिस्सा मागितला होता. त्याला पहिल्या लग्‍नापासून झालेल्या मुलांनी मालमत्तेच्या वाटणी करण्यास जोरदार आक्षेप धेतला. 

हा दावा न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी मुंबई उच्च न्यायालयासह अन्य उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या  निकालाचा संदर्भ देत पिता हयात असताना दुसर्‍या लग्‍नापासून जन्म झालेल्या मुलांना मालमत्तेवर हक्‍क सांगता येणार नाही, असे स्पष्ट केले.

Tags : father alive, second wedding Boy, not entitled property,