Tue, Apr 23, 2019 01:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एटीएममधून पैसे काढणार्‍या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक 

एटीएममधून पैसे काढणार्‍या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक 

Published On: Dec 18 2017 2:38AM | Last Updated: Dec 18 2017 12:31AM

बुकमार्क करा

नालासोपारा : वार्ताहर

नालासोपारा येथे एटीएममधून पैसे काढणार्‍या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, याप्रकरणी हिलेरी ऊर्फ डेव्हीस किगन(27, रा.मिरारोड ,मूळ मोई अव्हेन्यू ,केनिया ) आणि अँगवे  इनोज मेरिट (31, रा.विरार, मूळ नायजेरिया)  या 2 नायजेरियनांना अटक करण्यात आली आहे. नालासोपार्‍यात विविध बँकांच्या एटीएम मधून ऑगस्ट महिन्यात लहान-मोठ्या रकमा परस्पर काढण्यात आल्याने खळबळ उडाली होती. नालासोपारा,तुळींज  पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या. 

जुलै महिन्यात पोलिसांना एटीएम कार्डाचे क्लोनीग करणारा डिव्हाईस सापडला होता. त्याद्वारे हा अपहार केल्याचा पोलिसांचा संशय होता. एटीएम यंत्रात स्कीमर नावाचे यंत्र बसवण्यात येते. कुणी कार्ड टाकले तर त्या कार्डाचे क्लोनिंग केले जाते. आरोपी एटीएम मशीन केबिनमध्ये एक मशीन, वायफाय  कॅमेरा बसवून ठेवायचे. खातेदारांनी आपले एटीएम मशीनमध्ये टाकून पिन नंबर व एटीएम नंबर दाबला की तो कॅमेरामध्ये आरोपींना दिसायचा त्यानंतर आरोपी लॅपटॉप मधून नंबर काढून कार्ड क्लोनिंगच्या आधारे खात्यातील रक्कम काढायचे.

मीरा रोड येथे राहणारा नायजेरियन एटीएम मशीनमध्ये चिनी बनावटीचे स्कीमर मशीन व एक कॅमेरा लाऊन हे काम करायचा. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाने गेल्या आठवड्यात नालासोपारा पश्‍चिमेतून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला.