Wed, Sep 26, 2018 16:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अबू सालेमचा पॅरोल उच्च न्यायालयाने फेटाळला

अबू सालेमचा पॅरोल उच्च न्यायालयाने फेटाळला

Published On: Aug 07 2018 12:27PM | Last Updated: Aug 07 2018 12:23PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

मुंबईत ११९३साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम याची ४५ दिवसांच्या पॅरोलचा अर्ज उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. सालेमने लग्न करण्यासाठी 45 दिवसांची सुट्टी मागितली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. 

सालेमला सध्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. मुंब्रा येथील रहिवासी कौसर बहार हिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने सुट्टीसाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. विशेष म्हणजे याआधी देखील न्यायालयाने सालेमचा पॅरोलचा अर्ज फेटाळून लावला होता. पण त्याने न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुन्हा एकदा अर्ज केला होता.