Tue, Jun 18, 2019 22:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये बॉम्बची अफवा

लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये बॉम्बची अफवा

Published On: May 22 2018 1:39AM | Last Updated: May 22 2018 1:19AMटिळकनगर : वार्ताहर

लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने सोमवारी दुपारी प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.  सध्या सुट्टीचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होती. दोन्ही बॅगची तपासणी केली असता त्यात कपडे आढळल्यानंतर प्रवाशांची सुटकेचा निःश्‍वास सोडला.

एक अज्ञात प्रवासी आपल्या दोन मोठ्या बॅग टर्मिनल्सजवळील गर्दीच्या रस्त्यावर विसरून गेला होता. याबाबतची माहिती काही प्रवाशांनी पोलिसांना दिली. या बॅगेत बॉम्ब आहे, अशी अफवा रेल्वे प्रवाशांमध्ये पसरली.  बॅगेची पाहणी करण्यासाठी श्वान पथक, बॉम्बशोधक पथक दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता दोन्ही बॅगेमध्ये फक्त कपडे आणि इतर वस्तू आढळून आल्या. या बॅगा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.