Mon, Jun 24, 2019 17:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सूरजच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास कोर्ट असमर्थ

सूरजच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास कोर्ट असमर्थ

Published On: Feb 07 2018 1:38AM | Last Updated: Feb 07 2018 1:33AMमुंबई : प्रतिनिधी 

बॉलीवूडअभिनेत्री  जिया खान हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या अभिनेता सूरज पांचोलीच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने आज असमर्थता दर्शविली. न्यायमूर्ती रेवती मोहित ढेर यांनी ही असमर्थता दर्शविताना सूरजला दुसर्‍या न्यायालयाकडे जाण्याचे निर्देश दिले. जिया खान आत्महत्याप्रकरणी सेशन्स कोर्टात सुरू असलेला खटला जलदगतीने चालवून निकाल लावण्यात यावा,अशी सूरज पांचोलीने याचिका केली आहे. 

त्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेर यांच्या खंडपीठसमोर सुनावणी झाली. यापूर्वी पांचोली खटल्यात सरकारच्या वतीने न्यायमूर्ती रेवती मोहित ढेर यांनी बाजू मांडल्याने न्यायमूर्ती म्हणून या खटल्यावर सुनावणी घेण्यास असमर्थता दर्शविली.